success story farmer mohan mahadik  mandangad kokan agriculture  marathi news 
कोकण

Success Story : पन्नास शेळ्यांच्या मदतीने खडकाळ जमिनीवर फुलवले बुश काळीमिरीचे लेंगर 

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) :  कमी जागेत जास्त उत्पादन घेता यावे, यासाठी व्हर्टिकल फार्मिंग व बंदिस्त शेती, हेच कृषी उत्पादनाचे भविष्य असणार हे ओळखून मंडणगड येथील मोहन महाडिक यांनी खडकाळ जागेवर शेटनेट उभारून 100 सिमेंट कुंड्यांमध्ये बुश प्रकारच्या काळीमिरीची यशस्वी लागवड केली आहे. सेंद्रिय लेंडी खते दिल्याने रोपांना वर्षभराच्या आतच लेंगर म्हणजे फळधारणा झाली आहे. नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंगद्वारा विकसित अशा नैसर्गिक लेंडीखताची निर्मिती करून त्याचे ब्रॅंडिंग करण्यात येणार आहे. 

मोहन महाडिकांची मेहनत; यशस्वी लागवड

मोहन महाडिक यांची वडिलोपार्जित सामाईक डोंगराळ जमीन आहे. त्याची साफसफाई करून त्यांनी 2001 मध्ये वेंगुर्ला 4 व 7 जातीच्या काजूंची लागवड केली. त्यातून त्यांना नियमित उत्पादन मिळत आहे. 2007 मध्ये त्यांनी इमूपालन प्रकल्प राबविला. 2013 मध्ये शेळीपालन सुरू केले. यामध्ये त्यांना बहीण मनीषा व मेव्हणे मारुती खेडेकर यांची मोलाची मदत मिळाली. त्यांच्याकडे 50 शेळ्या असून लेंडीपासून बायोक्‍युलम या जिवाणू कल्चरच्या साहाय्याने कंपोस्ट लेंडी खत तयार करतात. हे पूर्णतः नैसर्गिक असून मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी केली आहे.


 नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून 50 बाय 50 फूट आकाराची शेडनेट उभारून त्यामध्ये 10 जुलै 2020 मध्ये कुंड्यांमध्ये बुश काळीमिरी लागवड केली. कोकण कृषी विद्यापीठाच्या आवाशी फळसंशोधन केंद्रामधून पन्नीयुर-1 जातीची रोपे आणली. बुश पेपरच्या रोपांना पहिल्या वर्षांपासून उत्पन्न येते, याचा प्रत्यय आला असून आठ महिन्यातच काळीमिरी लेंगर आले आहेत. 

व्हर्टिकल कॉलम पद्धतीचा अवलंब 
देवगड येथील राजन राणे यांनी विकसित केलेल्या व्हर्टिकल कॉलम पद्धतीचा अभ्यास करून महाडिक यांनी काळीमिरी लागवड केली. त्यासाठी त्यांनी 16 सिमेंट कुंड्या आणल्या असून फक्त पाव गुंठा जागेत एकावर एक अशा चार कुंड्यांची मांडणी करून चार कॉलम तयार केले आहेत. त्यात एकूण 64 रोपांची लागवड करणार आहे. 
 
लेंडी खताचे ब्रॅंडिंग करून विक्री 
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून लेंडी खताचे ब्रॅंडिंग करून विक्री करण्यात येणार आहे. त्याचे प्रक्रिया युनिट उभारण्यात आले असून सध्या त्यांच्याकडे 15 टन लेंडी खत उपलब्ध आहे. 

शेतकऱ्यांना कंपोस्ट लेंडी व शेणखत तयार करण्यासाठी मार्गदर्शन व तांत्रिक साहाय्य करता येईल. खेकडा शेतीचा संकल्प असून त्यासाठी तलावरूपी टाकी बांधली आहे. कोकणातील कृषी उत्पादनांना मागणी असल्याने निर्मिती होणे अपेक्षित आहे. 
- मोहन महाडिक.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT